कुठलीही व्यक्ती अचानक आत्महत्या करत नाही, त्याला काहीतरी पूर्वइतिहास असतो. अबोध मनात काहीतरी दाबून ठेवलेलं असतं. ते सतत समाजमान्य मार्गानं बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतं.

मनोविश्लेषण प्रणेते सिग्मंड फ्रॉइड असं म्हणतात की, आपलं भावविरेचन होणं आवश्यक आहे. मनात जे साठलं आहे, ते बाहेर पडणं महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्या जीवनात असा एक तरी नातेवाईक किंवा मित्र असला पाहिजे की, ज्याच्याशी आपल्या वैयक्तिक, खाजगी गोष्टी बोलता आल्या पाहिजेत. अशा व्यक्तीशी सतत बोललं पाहिजे. बोलल्यामुळे मनात जे साठून राहिलं आहे ते बाहेर येतं आणि मूळ समस्येवर उपचार करता येतो.......